दिवाळीनिमित्त जनआधार फाऊंडेशनकडून सुगंधी उटणे वाटप

0

सोलापूर,दि.11: दिपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने जनआधार फाऊंडेशनकडून संस्थापक आनंद गोसकी यांच्या संकल्पनेतुन ‘सुगंधी दिवाळी आनंदी दिवाळी’ या उपक्रमाच्या माध्यमातुन सोलापूर महापालिका प्रभाग क्र. 8 मध्ये दरवर्षी प्रमाणे जनआधार फाऊंडेशनच्या वतीने आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने परीसरातील दीड हजार कुटुंबियांना 9 नोंव्हेंबर /10 नोंव्हेंबर घरोघरी जावुन नागरीकांना सुगंधी उटणे वाटप करण्यात आले.

सुगंधी उटणे हा अगदी अगरू उद, चंदन, कस्तुरी, केशर ईत्यादी सुगंधी पदार्थापासुन केलेल मिश्रण असते. उटणे लावून शरीर/चेहरा स्वच्छ होतो व कांती उजळते. नागरीकांना उटणे वापरण्याची माहिती देवुन शुभेच्छा संदेश देण्यात आले. नागरीकांकडून आनंद गोसकी यांना ही आर्शिवादरूपी दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जनआधार फाऊंडेशनकडुन महेश दासी, शाम कोटा, रूषिकेश चिलवेरी, दिनेश सुरा, दिनेश श्रीकोंडा, शंकर म्हंता, हर्षित गोसकी यांनी घरोघरी जावुन नागरीकांना कोणतेही समस्या असल्यास नागरीकांनी संपर्क साधण्यास आवाहन आनंद गोसकी मित्र परीवाराकडून करण्यात आले. तसेच दिवाळी निम्मित्त जनआधार फाऊंडेशनच्यावतीने गरजूंना फराळ वाटप करण्यात येते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here