जम्मू,दि.21: Jammu Kashmir Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पूंछ-जम्मू महामार्गावर एका लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे भीषण आग लागून 5 जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या पूंछ परिसरात पुन्हा एकदा भारतीय सैन्यदलाच्या जवानांना टार्गेट करण्यात आलं आहे. (Jammu Kashmir News)
भारतीय जवानांच्या गाडीवर हल्ला | Jammu Kashmir Terror Attack
जवानांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात सतत दहशतवाद्यांकडून गेल्या काही दिवसांत कुरघोडी सुरूच आहेत.
एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लष्कराचं वाहन पूंछ जिल्ह्यातील भिंबर येथून संगिओतकडे जात होतं. यावेळी पूंछ-जम्मू महामार्गावर दहशतवाद्यांनी या वाहनावर हल्ला केला.
दहशतवादी हल्ला झाल्यानंतरचा व्हिडीओ
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर लष्कराच्या वाहनाला आग लागली, या आगीत पाच जवानांचा होरपळून मृत्यू झाला. पूंछ जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धुक्याचा फायदा घेत अज्ञात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा वापर केल्यामुळे गाडीला आग लागली, अशी माहिती नॉर्दन कमांडने दिली.
सिद्रा आणि राजौरी भागात याआधी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. आता पूंछ भागात गाडीवर ग्रेनेड हल्ला केला आहे.
या ग्रेनेड हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला एवढा भयंकर होता की गाडी पूर्ण जळून खाक झाली.