IT Raids BBC: BBC च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

IT Raids BBC: बीबीसीच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत

0

नवी दिल्ली,दि.17: IT Raids BBC: ‘बीबीसी’च्या दिल्ली कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली आहे. (IT Raids BBC Delhi Office) सुत्रांच्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. तसंच कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून घरी जाण्यास सांगण्यात आलं आहे. बीबीसीच्या लंडनमधील मुख्यालयाला देखील दिल्लीतील कार्यालयाच्या सर्व्हेची माहिती देण्यात आली आहे. 

भारतात बीबीसीच्या प्रसारणावर बंदी आणावी अशी मागणी | IT Raids BBC Delhi Office

मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या माहितपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या माहितीपटातून गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याच कारणामुळे भारतात बीबीसीच्या प्रसारणावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे.

नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही | IT Raids BBC

मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाकडून बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात तपासणी तसेच चौकशी करत असल्याचे म्हटले जात आहे.

दिल्लीत बीबीसीच्या कार्यालयाचा आयकर विभागाकडून सर्व्हे केला जात असल्याचं  केल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं देखील दिलं आहे. दुसरीकडे या छापेमारीला काँग्रेसनं बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर घातलेल्या बंदीशी जोडलं आहे. “आधी बीबीसीची डॉक्युमेंट्री आली आणि त्यावर बंदी घातली गेली. मग बीबीसीवर इन्कम टॅक्सचा छापा टाकला गेला. अघोषित आणीबाणी”, असं ट्विट काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here