Child Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी देशात लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. पुढील वर्षी 3 जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. सरकारने 15-18 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व लोक Co-WIN वर नोंदणी करू शकतात. (Registration can be done on Co-WIN app) 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व लोक नोंदणी करू शकतात.
लाभार्थी Co-WIN वर त्यांच्या विद्यमान खात्याद्वारे ऑनलाइन नोंदणी करू शकतात किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून नवीन खाते तयार करून नोंदणी देखील केली जाऊ शकते. ही सुविधा सध्या लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
लोक लसीकरणाच्या ठिकाणी ऑन द स्पॉट नोंदणी करू शकणार आहेत.
लसीकरणासाठी अपॉइंटमेंट्स ऑनलाइन किंवा ऑन द स्पॉट बुक केल्या जाऊ शकतात.
15-17 वयोगटासाठी फक्त Covaxin चा पर्याय उपलब्ध असेल कारण या वयोगटासाठी ही एकमेव लस उपलब्ध आहे.
बूस्टर डोससाठी दुसऱ्या डोसनंतर 9 महिन्यांचे अंतर आवश्यक असेल.
ही मार्गदर्शक तत्त्वे 3 जानेवारी 2022 पासून प्रभावी होतील आणि वेळोवेळी त्यांचे पुनरावलोकन केले जाईल.