IPL 2022, Mega Auction: अपेक्षेप्रमाणे, इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या (IPL) हंगामासाठी मेगा लिलाव धमाकेदारपणे सुरू झाला आहे. टीम इंडियाचा सीनियर ओपनिंग बॅट्समन शिखर धवनला (Shikhar Dhawan) पंजाब किंग्जने 8.25 कोटी रुपयांना विकत घेतलं आणि 2022 च्या मेगा लिलावात चांगली सुरुवात केली. धवनबाबत आधी दिल्ली आणि राजस्थानमध्ये बोलीयुद्ध झाले, नंतर पंजाब किंग्जनेही सामन्यात एंट्री घेत दिल्लीला तगडी टक्कर दिली. गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला धवन या हंगामात पंजाबसाठी लाल जर्सीमध्ये दिसणार आहे. या मेगा लिलावात विकला जाणारा धवन पहिला खेळाडू ठरला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने सलामीवीर शिखर धवनसाठी पहिली बोली लावली, त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. 4 कोटींनंतर पंजाब किंग्सनेही शिखर धवनसाठी बोली लावायला सुरुवात केली. त्यानंतर दिल्ली आणि पंजाब यांच्यातही चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. शिखर याआधी या लीगमध्ये मुंबई, दिल्ली आणि हैदराबादकडून खेळला आहे.
आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी (IPL Season 15) आज (शनिवार) मेगा लिलाव (IPL Season 15 Auction 2022) होणार आहे. या वर्षी लिलावासाठी बीसीसीआयने 590 खेळाडूंची निवड केली असून स्पर्धेतील 10 संघ त्यांच्यावर बोली लावतली. या वर्षी आयपीएलमधील संघाची संख्या 8 वरून 10 इतकी झाली आहे. श्रेयस अय्यरला कोलकत्ता नाईट रायडर्सने 12.25 करोडची बोली लावत विकत घेतले आहे.