इन्फ्लुएंझा विषाणू | भारतात नव्या संसर्गाने वाढवली चिंता, निती आयोगाने केले हे आवाहन

0

नवी दिल्ली,दि.11: इन्फ्लुएंझा विषाणू | कोरोनानंतर आता H3N2 व्हायरस (इन्फ्लूएंझा व्हायरस) पसरू लागला आहे. देशभरात इन्फ्लूएंझा ए सब टाईप H3N2 च्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांमध्ये विषाणूच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय आणि अनपेक्षित बदल झाल्याची माहिती दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील आरोग्य तज्ज्ञांनी गुरुवारी दिली. देशभरातील रुग्णालयांमध्ये H3N2 इन्फ्लूएंझाची हजारो रुग्णांची नोंद होत आहे.

गर्दीच्या ठिकाणी मास्क (Mask) वापरण्याचं आवाहन निती आयोगानं केलं आहे. भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत.

कोरोनासारखा पसरतो इन्फ्लुएंझा विषाणू

सध्या कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूनं डोकं वर काढलं आहे. हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही बेजार झाली आहेत. औषधं घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळताना दिसत नाहीय. हा व्हायरल संसर्ग H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होत आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू H1N1 इन्फ्लूएंझा विषाणूचा उपप्रकार म्हणजेच बदललेलं स्वरुप आहे.

H3N2 विषाणू संसर्गाची लक्षणं

H3N2 इन्फ्लूएंझा हा व्हायरल फ्लू आहे. याची लक्षणे कोरोना प्रमाणेच आहेत. ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here