उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या कर्मचाऱ्याचा फोटो शेअर करत केले कौतुक

0

दि.24 : उद्योगपती रतन टाटा हे देशातील प्रतिष्ठित असे व्यक्तिमत्व आहे. उद्योगपती रतन टाटा समाज कार्यात नेहमी अग्रेसर असतात. जेंव्हा जेंव्हा कुठले संकट येते तेंव्हा तेंव्हा उद्योगपती रतन टाटा मदतीला धावून येतात. उद्योगपती रतन टाटांनी अनेकांना मदत केली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या चांगुलपणाचाही नेहमी ते कौतुक करताना दिसतात. मुसळधार पावसात अनेकजण स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करतात. मुसळधार पाऊस पडत असेल तर छत्रीचा उपयोग अनेकजण करतात.

उद्योगपती रतन टाटांच्या कर्मचाऱ्यानेही मुसळधार पावसात छत्रीचा सहारा घेतला. मात्र या कर्मचाऱ्याने स्वतःबरोबर एका भटक्या कुत्र्यालाही आपल्या छत्रीचा सहारा दिला. त्यांनी दाखवलेल्या दयाळूपणाचे कौतुक स्वतः उद्योगपती रतन टाटा यांनी केले आहे.

मुंबईत पाऊस पडत असताना ताजमहाल पॅलेसच्या एका कर्मचाऱ्याचे त्याचा दयाळूपणा दाखवून दिला आणि सोशल मीडियावर त्याचा फोटो देखील व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक कर्मचारी पावसादरम्यान एका भटक्या कुत्र्यासह त्याची छत्री शेअर करत आहे. त्याने त्याच्या छत्रीत एका कुत्र्याला आसरा दिला आहे. कर्मचाऱ्याच्या या दयाळूपणा पाहून टाटा समुहाचे चेअरमन रतन टाटा देखील प्रभावित झाले आहेत. त्यांनी लगेच सोशल मीडियाचा आधार घेत हा फोटो शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामवर हा फोटो उद्योगपती रतन टाटा यांनी शेअर केला आहे. त्यांनी हा फोटो पोस्ट करताना असं कॅप्शन दिलं आहे की, ‘रस्त्यावरील कुत्र्यासह आराम शेअर करताना… हा ताजचा कर्मचारी दयाळू आहे, त्याने आपली छत्री रस्त्यावरील श्वानासह शेअर केली जेव्हा जोरदार पाऊस कोसळत होता. मुंबईच्या व्यस्त गर्दीत टिपलेला एक हृदयस्पर्शी क्षण. यासारखे भाव भटक्या प्राण्यांसाठी मोठा मार्ग निश्चित करतात.’ उद्योगपती रतन टाटा यांनी शेअर केलेल्या या फोटोवर 1 मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. दरम्यान या फोटोवर कमेंट्सचाही पाऊस पडला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here