भाजपा मनसे युतीबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक विधान

0

पिंपरी चिंचवड,दि.7: भाजपा मनसे युतीबाबत (MNS BJP Alliance) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सूचक विधान केलं आहे. राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत सत्तांतर घडवून आणले. राज्यात भाजपा शिंदे गटाचे सरकार सत्तेत आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपा यांच्यात भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीची (MNS BJP Alliance) चर्चा रंगली आहे. पण, ‘राज ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासंदर्भात आज कुठलीही चर्चा नाही, जसे जसे दिवस पुढे जातील तशी तशी चर्चा होईल, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे यांनी शिवसेनेवर टीका केली. तसंच, मनसेसोबत युतीवरही भाष्य केलं.

पक्ष संघटना मजबूत करणे याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना विरोध करणे असा होत नाही. एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असेल तर त्याला संपूर्ण ताकद आणि पाठबळ देण्याचे काम भाजप करेल, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मनसे भाजप युती संदर्भात देखील बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं. ‘राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासंदर्भात आतापर्यंत कुठलीही ठोस चर्चा झाली नाही. जसजसं दिवस पुढे जातील तसं तशी चर्चा होईल, असं बावनकुळे म्हणाले.

जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते देशाला अन्न वस्त्र निवारा देऊ शकले नाही, आता शेवटचे घरघर लागली तर भारत जोडो आंदोलन करतात त्याचा काही उपयोग होणार नाही, असं म्हणत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here