सोलापुरात वंचितचे राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

0

सोलापूर,दि.22: सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाच्या राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. सोलापुरात एमआयएमनेही लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला नाही.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसलाय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.

राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. एमआयएम आणि वंचितचे उमेदवार नसल्यामुळे प्रणिती शिंदे यांना मुस्लिम आणि दलित मतदान मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

भाजपला मदत होऊ नये म्हणून निर्णय

मी जर अर्धवट लढलो तर भाजपच्या कार्यकर्त्याला मदत करतोय, असं वाटतंय. भाजपच्या उमेदवाराला सोईचं वातावरण निर्माण होईल का, अशी मला भीती वाटत आहे. भाजपचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल. संविधानाला धोका निर्माण होईल, असं माझ्याकडून काही होऊ नये असे मला वाटतं, असं थेट स्पष्टीकरण राहुल गायकवाड यांनी दिलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here