सोलापूर,दि.२०: चाचण्यांची संख्या कमी असूनही सोलापूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लस हे मोठे हत्यार आहे. सोलापूर शहर नवीन २१८ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ३१५८२ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८२३२ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १८७८ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४७२ झाली आहे. यात ९३९ पुरुष व ५३३ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ९७८ अहवाल प्राप्त झाले. यात ७६९ निगेटिव्ह तर २१८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १०८ पुरुष आणि ११० महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ५० बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.