सोलापूर शहर ११ जणांनी केली कोरोनावर मात, रुग्ण संख्येत वाढ

0

सोलापूर,दि.१५: सोलापूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाचण्यांची संख्या कमी आहे तरी रुग्ण वाढ कायम आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लस हे मोठे हत्यार आहे. सोलापूर शहर नवीन १७७ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ३०५२३ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८०८५ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ९७४ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४६४ झाली आहे. यात ९३७ पुरुष व ५२७ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ७८५ अहवाल प्राप्त झाले. यात ६०८ निगेटिव्ह तर १७७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ९८ पुरुष आणि ७९ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ११ बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here