असा मेसेज किंवा मेल आला असेल तर वेळीच व्हा सावध

0

दि.6 : अलीकडच्या काळात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. फसवणूक करणारे वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. भारत सरकारच्या नावाने बनावट लॉटरी स्कॅम चालवले जात आहेत. हे फसवणूक करणारे तुम्ही भाग्यवान विजेते असल्याचा मेसेज ग्राहकांना पाठवतात आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतात. अशाप्रकारे लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवणाऱ्या अनेक टोळ्या सक्रीय आहेत. जर तुम्हाला लॉटरीशी संबंधित संदेश, ईमेल किंवा कॉल आला असेल तरल तर वेळीच सावध व्हा! केंद्र सरकारने ट्वीट करून अशा एसएमएस आणि ई-मेलबाबत सावध (PIB Fact Check Alert) राहण्यास सांगितले आहे.

या SMS मध्ये करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी केंद्रीय संस्था असणाऱ्या पीआयबीने केली. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) च्या टीमने या प्रकारच्या लॉटरीबाबत सावध राहण्यास सांगितले आहे.

PIB ने केलं आहे ट्वीट

PIB ने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, अशा बनावट लॉटरीशी संबंधित संदेश, कॉल आणि ईमेलपासून सावध राहा, हे फसवणूक करणाऱ्यांचे आर्थिक फसवणुकीचे प्रयत्न आहेत. #PIBFacTree पाहा आणि स्वतःला फसवण्यापासून वाचवा. जर तुम्हाला अशी कोणतीही लॉटरी जिंकण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांकडून फोन कॉल/ईमेल/मेसेज आला तर लगेच सतर्क व्हा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here