सोलापूर,दि.१: आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक कुणाल बाबरे यांच्यातर्फे 1 मे महाराष्ट्र दिन व कामगारदिन साजरा करण्यात आला. यावेळेस महापालिकेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगार व महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच कामगारांचे नेतृत्व कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या महापालिकेतील कार्याबद्दल त्यांचा आयडल्स संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते डॅा. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली व महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व मान्यवर व कामगारांच्या हस्ते कस्तुरबा मार्केट येथील सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे शहर कमिटी सदस्य विक्रांत गायकवाड तसेच आयडल्स सामाजिक संस्थेचे उत्सव अध्यक्ष श्रीशैल हिरेमठ, सुमित शिवशरण, ॲड. राज बाबरे, आनंद बनसोडे, शेरा तुळसे, सुमित बाबरे, अमोल जोंजट, अनिल बाबरे, रोहन गायकवाड, कपिल बाबरे, मुन्ना सुरते, गणेश सोनवणे, अंबादास गायकवाड, कपिल कांबळे, उज्वल बाबरे, पीयूष दावणे व संस्थचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.