ias officer harjot kaur: मुलीने सॅनिटरी वर प्रश्न विचारला तर महिला IAS अधिकाऱ्याने उत्तर देताना सर्व मर्यादा ओलांडल्या

0

पटना,दि.28: ias officer harjot kaur: बिहारमधील एका वरिष्ठ महिला आयएएस (IAS) अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विचित्र विधानामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात एका शाळकरी मुलीने विचारले की, सरकार 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का? यावेळी या महिला अधिकाऱ्याने सर्व मर्यादा तोडल्या व मग उद्या कंडोमपण मोफत द्यावे लागतील असे उत्तर दिले आहे. 

सॅनिटरी पॅडच काय, उद्या जीन्स पँटही देऊ शकतो, परवा चप्पलही का देऊ शकत नाही? एवढेच काय उद्या कुटुंब कल्याणवरून मागणी झाली तर कंडोमही मोफत देऊ शकतो, असे वक्तव्य आयएएस अधिकारी हरजोत कौर (ias officer harjot kaur) यांनी केले आहे. 

महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांनी ‘सशक्त बेटी, समृद्धी बिहार: गर्ल चाइल्डचे मूल्य वाढवण्याच्या दिशेने’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत विद्यार्थीनीने हा प्रश्न मांडला होता, त्यावर कौर यांनी हे वादग्रस्त उत्तर दिले. 

यापुढे जाऊन कौर यांनी आणखी काही वक्तव्ये केली आहेत. कौर यांच्या या उत्तरावर जनतेच्या मताने सरकार बनते, असे विद्यार्थिनीने म्हटले असता, हा मूर्खपणाचा कळस असल्याचे म्हटले. असे जर तुम्हाला वाटत असेल तर मतदान करू नका, पाकिस्तानात जा, असे वक्तव्य केले. यावर विद्यार्थीनीने मी भारतीय नागरिक आहे मग पाकिस्तानात का जाऊ असे विचारले असता, तुम्ही पैसे आणि सेवा मिळविण्यासाठी मत देता का असा सवाल केला. कौर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here