Accident: सांगोला तालुक्यातील कार, रिक्षा अन् दुचाकीचा तिहेरी अपघातात पती-पत्नी ठार

0

सोलापूर,दि.30: भरधाव कार, रिक्षा व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी भीषण अपघातात (Accident) गंभीर जखमी झालेल्या शेतमजूराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या पत्नीचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. हा अपघात काल सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास सांगोला – पंढरपूर रोड वरील (Sangola – Pandharpur Road) हॉटेल चंद्रमाला जवळ घडला. (Sangola Accident)

या अपघातानंतर रिक्षा चालक रिक्षा घेऊन पळून जाताना ग्रामस्थांनी बामणी (ता. सांगोला) गावात पकडले. ज्ञानदेव नामदेव भिसे (वय -45) व बबिता ज्ञानदेव भिसे – (वय -40 दोघेही रा. फणेपुर ता. लोहारा जि. उस्मानाबाद) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. या अपघातात कार चालक जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस नाईक राहुल देवकते घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून सांगोला रुग्णालयात हलवले. मृतांचे नातेवाईक (मूळ फणेपूर ता.लोहारा जि.उस्मानाबाद)  येथून  येण्यास विलंब लागल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते तर अपघाताची नोंदही झाली नव्हती. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here