महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय; दहावी, बारावी परीक्षेच्या नियमांत मोठा बदल

0

मुंबई,दि.9: महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. दहावी, बारावी परीक्षेच्या नियमांत मोठा बदल केला आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या दहावी, बारावी परीक्षांचे नियम बदलण्यात आले आहेत. यंदाच्या एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. याचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे. असे असताना बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनापूर्व नियमावली लागू करण्यात येणार

विद्यार्थ्यांना यंदापासून त्यांच्या शाळेतच त्यांचे परीक्षा केंद्र मिळणार नाही, तसेच कोरोना काळात जो 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जात होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे. कोरोनापूर्व नियमावली लागू करण्यात येणार असून पूर्वीप्रमाणेच नियम असणार आहेत. 

जुने नियम परत आणणार

“कोरोना महामारीवेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या होम सेंटर्सची म्हणजेच ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षेची सुविधा आणि 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ सुरू करण्यात आला. आता कोरोनाचा फार मोठा धोका नसल्यामुळे, आम्ही जुने नियम परत आणत आहोत” असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना नेमलेल्या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार

ऑनलाइन वर्गादरम्यान विद्यार्थ्यांना अडचणी आल्याने त्यांना भरपाईसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी होम सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली होती. आगामी बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना नेमलेल्या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here