Mahesh Ingale: वटवृक्ष मंदिरातील स्वामी सेवेबद्दल मंचर वासियांकडून महेश इंगळेंचा सन्मान 

0

अक्कलकोट,दि.१९: Mahesh Ingale: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील सुशोभीकरण, गाभारा नुतनीकरणासारखी महत्वाची कामे करून स्वामी भक्तांना  प्रसन्न वातावरणातील स्वामी दर्शनाची संधी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे (Mahesh Ingale) यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. याबद्दल सर्व स्वामी भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे. येथे आल्यानंतर स्वामी दर्शनाबरोबरच आत्मिक समाधानाची अनुभूती भाविकांना येत आहे.

मंदिरातील सुशोभीकरण व पावित्र्य त्यास कारणीभूत आहेत. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे (Mahesh Ingale) यांनी स्वामी सेवेच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेळ मंदिर समितीस व मंदिराच्या कार्यालयीन कामासोबतच धार्मिक कामकाजांना महत्त्व देऊन मंदिराची, स्वामींची सेवा करीत असतात. त्यांच्या या उत्कृष्ट स्वामी सेवेबद्दल आज पुणे जिल्ह्यातील मंचर व परिसरातील नागरीक स्वामी भक्तांकडून मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांचा सन्मान करण्यात आल्याचे मनोगत मंचरचे अजय घुले यांनी व्यक्त केले.

ते नुकतेच सहकार्‍यांसोबत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर चेअरमन महेश इंगळे (Mahesh Ingale) यांची भेट घेत पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी बोलताना घुले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अजय घुले व सहकाऱ्यांचे श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, जयसिंग इंगळे, प्रसाद सोनार, मंचरचे प्रविण थोरात, दत्ताञय जाधव, अजय घुले, प्रणय महाजन, भरत मेंगडे, नितिन बागल, संतोष चासकर, संतोष बुट्टे, ज्ञानेश्वर निकम, दत्ताञय थोरात, शैलेश बाणखेले, उद्धव गुंजाळ, अशोक चिंचवडे, बबन चव्हाण, इत्यादी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here