Home देश खासदार बनवली, पक्षात आणलं, पण शेवटी…; भाजपच्या ‘या’ बड्या महिला खासदाराने पतीला...

खासदार बनवली, पक्षात आणलं, पण शेवटी…; भाजपच्या ‘या’ बड्या महिला खासदाराने पतीला दिला घटस्फोट!

0

मुंबई,दि.१५: मध्य प्रदेशातील शहडोलच्या भाजप खासदार हिमाद्री सिंह (Himadri Singh) यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा निर्णय घेत पती नरेंद्र सिंह मरावी यांच्यापासून कायदेशीर घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दांपत्य वेगळे राहत होते, ज्यावर आता अधिकृतपणे पडदा पडला आहे.  

लग्नापासून घटस्फोटापर्यंतचा प्रवास

हिमाद्री सिंह (Himadri Singh) आणि नरेंद्र मरावी यांचा विवाह २३ नोव्हेंबर २०१७ रोजी अनुपपूर जिल्ह्यातील पुष्पराजगड येथे झाला होता. या दांपत्याला ‘गिरिशा कुमारी सिंह’ नावाची मुलगी असून ती हिमाद्री सिंह (Himadri Singh) यांच्यासोबत राहते. प्रदीर्घ काळ विभक्त राहिल्यानंतर अखेर या संसाराचा शेवट झाला आहे.  

राजकीय वारसा आणि हिमाद्री सिंह (Himadri Singh) यांचा प्रवास

हिमाद्री सिंह (Himadri Singh) या मध्य प्रदेशातील एका वजनदार आदिवासी राजकीय कुटुंबातून येतात.  

वडिल दलवीर सिंह: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजीव गांधी सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री.  

आई राजेश नंदिनी सिंह: माजी आमदार आणि शहडोलच्या माजी खासदार.  

आई-वडिलांच्या निधनानंतर हिमाद्री सिंह (Himadri Singh) यांनी २०१६ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर पहिली निवडणूक लढवली होती. मात्र, २०१९ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी २०१९ आणि २०२४ अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये शहडोलमधून दणदणीत विजय मिळवला. उच्चशिक्षित हिमाद्री सिंह (Himadri Singh) यांची गणना देशातील आघाडीच्या युवा आदिवासी नेत्यांमध्ये होते. नुकतेच त्यांनी उज्बेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या जागतिक युवा खासदार परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.  

सासूविरुद्ध लढलेले पती; पत्नीच्या भाजप प्रवेशात महत्त्वाची भूमिका

हिमाद्री सिंह (Himadri Singh) यांचे पती नरेंद्र सिंह मरावी हे अभाविप (ABVP) आणि भाजपशी जोडलेले असून त्यांनी अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र यांनी हिमाद्री सिंह (Himadri Singh) यांच्या आई राजेश नंदिनी सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती (ज्यात त्यांचा पराभव झाला होता). पुढे २०१७ मध्ये लग्न झाल्यानंतर हिमाद्री सिंह (Himadri Singh) यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणण्यात नरेंद्र मरावी यांचीच मुख्य भूमिका मानली जाते.  

बदललेली राजकीय समीकरणे

काळाच्या ओगात हिमाद्री सिंह (Himadri Singh) यांचा भाजपमधील राजकीय प्रभाव वाढत गेला, तर दुसरीकडे नरेंद्र मरावी पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होत गेले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मरावी यांनी तिकीटासाठी प्रयत्न केले होते. दोघांमधील वाढती दुरी आणि कौटुंबिक वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते, ज्याची परिणती अखेर घटस्फोटात झाली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.