Hijab Row: हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या कर्नाटकच्या सरन्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी

0

दि.20: Hijab Row: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 15 मार्च रोजी हिजाब (Hijab) प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना ही धमकी मिळाली आहे. सोशल मीडियावर एक धमकीचा व्हिडिओ समोर आल्याचे वृत्त आहे. व्हॉट्सॲपवर व्हिडिओ मेसेज आल्याचा आरोप वकील उमापती एस. यांनी केला आहे ज्यात सरन्यायाधीश रितू राज अवस्थी (Ritu Raj Awasthi) यांना ‘हत्येची धमकी’ देण्यात आली होती.

कर्नाटकातील बहुतांश भागात हिजाब हा वादाचा मुद्दा बनला होता. त्यानंतर न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, हिजाब ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही. वकिलाने सांगितले की, “व्हिडिओ पाहून मला धक्का बसला. म्हणून मी ताबडतोब (उच्च न्यायालय) रजिस्ट्रारशी संपर्क साधला.” रजिस्ट्रारला लिहिलेल्या पत्रात, वकिलाने सांगितले की, “मला माझ्या संपर्कांकडून सकाळी 9:45 वाजता एक व्हॉट्सॲप व्हिडिओ संदेश मिळाला, जो तमिळ भाषेत आहे.

वकिलाने आरोप केला आहे की हा व्हिडिओ “तामिळनाडू (बहुधा मदुराई जिल्हा) येथून पाठवला असावा.” सरन्यायाधीश कुठे फिरायला जातात हे मला माहीत आहे, असे सांगून कर्नाटकच्या माननीय सरन्यायाधीशांना धमकावण्यात आले आहे, असे वकिलाने सांगितले. या धमकीमध्ये झारखंडच्या न्यायाधीशांच्या हत्येचाही उल्लेख केला जात आहे. हिजाबबाबत न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here