सोलापूर,दि.९ : Solapur News: कर्नाटकात हिजाबवरून (Hijab) वातावरण चांगलेच तापले आहे. जानेवारी महिन्यात कर्नाटकातील उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयातील 6 विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने वाद सुरू झाला होता. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई केली होती, परंतु तरीही त्यांनी तो परिधान केला होता, यावरून वाद निर्माण झाला होता. या वादानंतर इतर कॉलेजांमध्येही हिजाबबाबत गोंधळ सुरू झाला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
कर्नाटक हिजाब प्रकरणाचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले आहेत याच पार्श्वभूमीवर सोलापूरातील AIMIM पक्षाने या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपोषण गेट समोर पोलिसांचा सकाळपासूनच मोठा बंदोबस्त होता कार्यकर्ते जमले तेव्हा पोलिसांनी हाकलून लावले होते मात्र शेवटी AIMIM महिला जिल्हाध्यक्षा रेशमा मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील निषेधार्थ मोर्चा काढून कर्नाटक सरकार आणि भारतीय जनता पार्टीचा निषेध नोंदविण्यात आला.
AIMIMच्या महिला आघाडीने कर्नाटक सरकारच्या हिजाब बंदीच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. सुरुवातीला कार्यकर्ते जमले तेव्हा पोलिसांनी त्यांना पांगवले होते. मात्र शेवटी एमआयएमच्या महिला जिल्हाध्यक्षा रेशमा मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोर्चा काढून कर्नाटक सरकार आणि भारतीय जनता पार्टीचा निषेध नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी ‘अल्लाह हू अकबर’ च्या घोषणाही दिल्या.
‘कर्नाटकमधील भाजपचे सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात काम करत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा नारा देतात, मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे सरकार मुलींनी शिकू नये म्हणून प्रयत्न करत आहे. आम्ही मुस्लीम मुली-महिला ‘हिजाब’मध्ये सुरक्षित आहोत. त्यामुळे हा निर्णय जाणीवपूर्वक मुस्लीम समाजावर घाला घालण्यासाठी घेतला जात आहे,’ असा घणाघाती आरोप रेश्मा मुल्ला यांनी यावेळी केला आहे.