Hijab Controversy: या कारणामुळे हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

0

नवी दिल्ली, दि.11: Hijab Controversy: हिजाब (Hijab) घालण्याची मागणी करणाऱ्यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी निर्णय येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाख परिधान करण्यास बंदी घातली असून तोपर्यंत शैक्षणिक संस्था सुरू करता येतील. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सोमवारी दुपारी अडीच वाजता होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. काँग्रेस नेते बीव्ही श्रीनिवास राव यांनीही याचिका दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कर्नाटकच्या हिजाब प्रकरणी (Hijab Controvercy ) सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू असून आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. सर्वोच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. सुप्रीम कोर्टाने हिजाब प्रकरणी दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, कर्नाटकात काय होतंय ते पाहत आहोत? सुप्रीम कोर्टाने वकिलांना सांगितले की, हा राष्ट्रीय स्तराचा मुद्दा बनवू नका आणि योग्य वेळी त्यात हस्तक्षेप केला जाईल. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here