विद्यार्थी, पालकांसाठी मिळणार समुदेशन
सोलापूर,दि.15: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्यापासून (12 वी-16 सप्टेंबर) तर 10 वी 22 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत आहेत. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास समुदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षेच्या काळात जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांनी आपल्या समस्येसाठी 10 वीसाठी हेल्पलाईन नं. 9423042627 आणि 12 वीसाठी 7588048650 यावर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत संपर्क करावा. सोलापूर जिल्ह्यासाठी सदाशिव माने विद्यालय, अकलूजचे पी.एस. तोरणे यांची नेमणूक केली असून त्यांचा भ्रमणध्वनी 9960002957 असा आहे.
परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास करताना व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे, प्रोत्साहन देणे आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी समुदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे.






