Bipin Rawat : तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त (Helicopter Crashes) झालं आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं (Helicopter Crashes) आहे. हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील (Chief of Defence Staff of the Indian Armed Forces Bipin Rawat) हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हवाई दलाने या माहितीला दुजोरा दिला आहे. (Helicopter Crashes) लष्कराच्या या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
आतापर्यंत तीन जवानांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून (Helicopter Crashes) दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.
या हेलिकॉप्टरमधून एकूण 14 जण प्रवास होते. यामध्ये बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या असं सांगितलं जात आहे. यामधील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.