नवी दिल्ली,दि.27: Maharashtra Crisis: शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणाचा युक्तिवाद लाईव्ह पाहता येणार आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठामध्ये होत आहे.
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
राजकीय पक्षाचे सदस्य विधिमंडळ पक्षाचे सदस्य असतील, तर ते वेगळा गट स्थापन करु शकत नाही; ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
फुटीर गट अपात्र ठरला, तर विधिमंडळ सदस्यत्वावर काय परिणाम?
Supreme Court Hearing Live : फुटीर गट अपात्र ठरला, तर विधिमंडळ सदस्यत्वावर काय परिणाम? अपात्रतेच्या निर्णयाचा पक्षचिन्हाच्या निर्णयावर परिणाम कसा? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाचे सवाल