हल्द्वानी हिंसाचार: पोलिस ठाण्यातच पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

0

मुंबई,दि.9: हल्द्वानी हिंसाचारावर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे गुरुवारी अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिस प्रशासनाच्या पथकावर हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. बनभूलपुरा येथील हिंसाचारानंतर तेथे संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारानंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, नैनितालच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. डीएम म्हणाले की, एका कटाचा भाग म्हणून पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला आणि पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हिंसाचार कसा झाला?

जिल्हाधिकारी वंदना सिंह म्हणाल्या, जमावाने पोलिस स्टेशनला घेराव घातला आणि पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना बाहेर पडू दिले नाही. त्यांच्यावर आधी दगडफेक आणि नंतर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. पोलिस स्टेशनच्या बाहेर वाहने जाळण्यात आली आणि धुरामुळे लोकांचा श्वास कोंडला गेला.

पोलिस स्टेशनच्याच सुरक्षेसाठी अश्रुधुराचा आणि पाण्याच्या वापर करण्यात आला. बनभुळपुरा येथील हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. या घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना डीएम वंदना सिंह म्हणाल्या की, जी जमीन मोकळी करण्यात आली आहे ती धार्मिक स्थळ नसून सरकारी नोंदींमध्ये ती वनविभागाची जमीन आहे जी आम्ही रिकामी केली आहे. जी वास्तू पाडण्यात आली ती मदरशाच्या नावावर नोंदणीकृत नव्हती.

त्या म्हणाले की, पण एका कटाचा एक भाग म्हणून पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला आणि हल्ल्याचे दीर्घ नियोजन करण्यात आले. ज्या अंतर्गत दगडफेक करण्यात आली, पेट्रोल बॉम्ब बनवले गेले आणि त्यानंतर हा हल्ला करण्यात आला. डीएम वंदना सिंह यांनी सांगितले की, पोलीस स्टेशनवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली जात आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान, डीएमने काही व्हिडिओ दाखवले आणि सांगितले की पोलिस प्रशासनाच्या टीमवर विनाकारण हल्ला करण्यात आला. डीएम वंदना सिंह म्हणाल्या, ‘अतिक्रमण हटवण्याची कारवाई शांततेत सुरू झाली आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्य तैनात करण्यात आले. प्रथम आमच्या महापालिकेच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. ज्या दिवशी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जाईल त्याच दिवशी हल्ला केला जाईल, असा डाव आखला गेला. दगडफेक करणारा पहिला जमाव पांगला आणि दुसरा जमाव पेट्रोल बॉम्ब घेऊन दाखल झाला. आमच्या टीमने कोणतीही ताकद वापरली नाही.

एकाच बांधकामावर ही कारवाई नव्हती

हल्द्वानीमध्ये मागच्या 15-20 दिवसांपासून बेकायद अतिक्रमणांविरोधात अभियान सुरु आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना झाली आहे, अशी माहिती डीएम वंदना सिंह यांनी दिली. हल्द्वानीमध्ये शहरात अतिक्रमण हटवून रस्ते रुंद करण्याच काम सुरु आहे. या संबंधी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here