Gyanvapi Masjid Update: वाराणसीत कलम 144 लागू, ज्ञानवापीवर आज निर्णय

0

वाराणसी,दि.12: Gyanvapi Masjid Update: सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश आज (सोमवार) ज्ञानवापी मशिद (Gyanvapi Masjid) परिसरामध्ये असलेल्या शृंगार गौरीच्या नियमित दर्शन-पूजेप्रकरणी निकाल देणार आहेत. ज्ञानवापी संकुलात (Gyanvapi Masjid) असलेल्या शृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि पूजन करण्याबाबत सोमवारी निर्णय होणार आहे. जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांचे न्यायालय खटल्याच्या देखभालक्षमतेवर म्हणजेच खटला चालवण्यायोग्य आहे की नाही यावर निकाल देणार आहेत. जिल्हा न्यायाधीशांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी देशाच्या स्वातंत्र्यदिनी ज्ञानवापी येथे मशीद किंवा मंदिर होते की नाही हे न्यायालयाच्या निर्णयामुळे ठरेल. यासोबतच प्रार्थनास्थळ कायदा 1991 लागू होईल की नाही हे ही ठरेल. आज दुपारी 2 वाजता न्यायालय निकाल देणार आहे. खबरदारी म्हणून वाराणसी प्रशासन याबाबत पूर्णपणे सतर्क आहे.

खबरदारी म्हणून वाराणसी प्रशासन याबाबत पूर्णपणे सतर्क आहे. शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. सर्वत्र फौजफाटा तैनात आहे. काशी विश्वनाथ धाम क्षेत्र-ज्ञानवापी परिसराचे छावणीत रूपांतर झाले आहे. सोशल मीडियावर बारीक नजर ठेवली जात आहे. सोमवारी सकाळी न्यायालयाच्या आवारात सखोल तपासणी करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here