Gyanvapi Case Updates: शृंगार गौरी ज्ञानवापी मशीद प्रकरणी वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय

0

वाराणसी,दि.12: Gyanvapi Case Updates: ज्ञानवापी खटल्यात (Gyanvapi Case) न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले शृंगार गौरी प्रकरण सुनावणी घेण्यायोग्य आहे. वाराणसीतील शृंगार गौरी-ज्ञानवापी मशीद प्रकरणी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टाने सोमवारी मोठा निकाल दिला. शृंगार गौरीच्या पूजेच्या अधिकारासाठी दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने सुनावणीस योग्य मानली आहे. (Gyanvapi Case Updates)

ज्ञानवापी परिसरातील शृंगार गौरीसह अन्य धार्मिक स्थळांवर नियमित पूजा करण्यास परवानगी देण्याची मागणी हिंदूंच्या वतीने करण्यात आली. त्याच वेळी, हे प्रकरण न्यायालयात टिकवून ठेवण्यायोग्य नसल्याचा युक्तिवाद करत मुस्लिम बाजूने हे प्रकरण बरखास्त करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, या प्रकरणाची सुनावणी नागरी प्रक्रिया संहितेच्या आदेश 07 नियम 11 अंतर्गत होऊ शकते.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणावर जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणी निकाल देताना कोर्टानं म्हटलं की, या वादावर सुनावणी केली जाईल. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 तारखेला होणार आहे. न्यायालयाने सांगितले की राखी सिंह विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य केस न्यायालयात चालविण्यायोग्य आहे. असा निर्णय देताना प्रतिवादी अंजुमन इनजतिया मस्जिद कमिटीचा अर्ज कोर्टानं फेटाळला आहे.

जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हा निकाल दिला. यावेळी हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन आणि विष्णू जैन यावेळी उपस्थित होते. याशिवाय लक्ष्मी देवी, रेखा आर्या आणि मंजू व्यास या 5 पैकी 3 फिर्यादी देखील पोहोचल्या होत्या. केवळ 40 पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना या सुनावणीवेळी प्रवेश मिळाला होता. इतर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला होता.

ज्ञानवापी मशीद खटल्यात हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितलं की, न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली आणि दावा कायम ठेवण्यायोग्य असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा हिंदू समाजाचा विजय आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here