गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री आणि कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच

Gram Panchayat Election Results: गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री बनल्या सरपंच

0

सोलापूर,दि.२०: Mah Gram Panchayat Election Results: आमदार गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री आणि इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंच बनल्या आहेत. राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Mah Gram Panchayat Election Results) आज जाहीर होत आहेत. राज्यातील दिग्गज नेत्यांची स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा यात पणाला लागली असून आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत.

Padalkarwadi Gram Panchayat Election Result:हिराबाई पडळकर सरपंच

आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदावर विजयी  झाल्या आहेत. निवडणूक लागल्यावर पडळकरवाडी गावामध्ये आधी हिराबाई पडळकर यांना बिनविरोध सरपंच करण्याचा ठराव केला होता. मात्र तालुक्यातील निवडणूका चुरशीच्या बनल्याने पडळकरवाडीमध्येही सरपंच पदासाठी देखील निवडणूक लागली होती. यात हिराबाई पडळकर विजयी झाल्या आहेत. 

गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच | Mah Gram Panchayat Election Results

पडळकरवाडीमध्ये प्रमुख कार्यकर्ते, नेत्यांची नोव्हेंबरमध्ये बैठक देखील पार पडली होती. ज्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. पण तालुक्यातील निवडणुका चुरशीच्या बनल्यानं पडळकरवाडीतही सरपंच पदासाठीही निवडणूक लागली. गोपीचंद पडळकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच भाजपचे स्टार प्रचारक देखील आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर विराजमान झाल्या आहेत. 

निळवंडे ग्रामपंचायत | Nilavande Gram Panchayat

संगमनेर तालुक्यात निळवंडे ग्रामपंयाचत निवडणुकीत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या सरंपचपदी निवडून आल्या आहेत. 

शशिकला पवार यांनी निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यात गावकऱ्यांनी विश्वास दाखवत शशिकला यांना विजयी केलं आहे. इंदोरीकर महाराजांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी होत असते. विनोदी शैलीनं आणि उदाहरणांनी प्रवचनातून समाजप्रबोधन करण्याची इंदोरीकर महाजारांची पद्धत अनोखी आहे. राज्यात विविध गावांमध्ये त्यांची दररोज प्रवचनं होत असतात आणि त्याला लोकांची चांगली पसंती देखील मिळते. आता इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई यांनी राजकारणात एन्ट्री घेतली असून त्यांच्या पुढील कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here