Google ने आपल्या कोट्यवधी युजर्सला नव्या धोक्याबाबत दिला इशारा

0

दि.6 : Google ने युजर्सला धोक्याचा इशारा दिला आहे. Google ने यापूर्वी धोकादायक App प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. आता Google Chrome मध्ये हॅकबाबतची माहिती समोर आली आहे. या हॅकनंतर ब्राउजर अपडेट करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हॅकिंगपासून वाचण्यासाठी लगेच Google Chrome अपडेट करा. युजर्सच्या सुरक्षेसाठी Google ने अपडेट जारी केलं आहे. Google ने युजर्सला त्वरित Chrome चं नवं वर्जन 94.0.4606.71 अपडेट करण्याचं सांगण्यात आलं आहे. हे अपडेट सर्व Google Chrome युजर्ससाठी आहे. Windows 10, क्रोमबुक, मॅक सर्वांनाच अपडेटबाबत सांगण्यात आलं आहे.

Google Chrome अपग्रेड का आवश्यक?

Google ने झिरो-डे या धोकादायक बगबाबत इशारा दिला आहे. हा केवळ एक बग नसून एकूण 4 आहेत. त्यापैकी दोन सर्वात धोकादायक आहेत आणि त्यांना अधिक जोखिम असणारे बग सांगण्यात आलं आहे. झिरो-डे एक्सप्लॉइड म्हणजेच सायबर क्रिमिनल्स याचा फायदा घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम होते. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सर्व युजर्ससाठी Google Chrome अपग्रेड आवश्यक आहे. लवकरात लवकर हे अपग्रेड करणं फायद्याचं ठरेल. अन्यथा युजरचा डेटा धोक्यात येऊ शकतो. हॅकर्स युजर्सच्या कंप्यूटरमधून त्यांचा डेटा आणि इतर माहिती चोरी करू शकतात.

असे करा सुरक्षित –

  • सर्वात आधी Settings मध्ये जा.
  • Help वर क्लिक करा.
  • About Google Chrome वर जा. इथे Chrome Version तपासा.
  • Google Chrome Version 94.0.4606.61 किंवा याहून अधिकचं वर्जन सुरक्षित आहे.
  • Google Chrome Update केल्यानंतर मशीन पुन्हा स्टार्ट करणं अतिशय आवश्यक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here