हे धोकादायक 7 ॲप्स Google ने Play store वरुन केले डिलीट

0

दि.16: Google नेहमीच धोकादायक Apps प्ले स्टोअर वरून डिलीट करत असते. अलीकडच्या काळात ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली आहे तसेच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. गुगलने यापूर्वीच अनेक धोकादायक ॲप्स प्ले स्टोअर वरून डिलीट केले आहेत. आता परत गुगलने 7 धोकादायक ॲप्स प्ले स्टोअर वरून डिलीट केले आहेत. Kasperskey येथील मालवेअर विश्लेषक ततयाना शिशकोवा (Tatyana Shishkova) यांनी या सर्व 7 ॲप्समध्ये मालवेअर ओळखले होते. त्यांनी सांगितले की हे धोकादायक ॲप ‘ट्रोजन’ (Trojan) जोकर सारख्या मालवेअरने संक्रमित आहे. अलीकडे Squid Game वापरकर्त्यांना अशाच प्रकारच्या मालवेअर हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे.

मोबाईलमधून हे धक्कादायक ॲप्स करा डिलीट

Google ने हे ॲप्स Google Play Store वरून काढून टाकले आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे 7 धोकादायक ॲप्स असतील तर ते लगेच काढून टाका. अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. वास्तविक, हे धोकादायक ॲप्स आतापर्यंत कोटींच्या संख्येने डाऊनलोड झाले आहेत. अशा परिस्थितीत, सर्व वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमध्ये असे धोकादायक ॲप्स आहेत की नाही हे तपासले पाहिजे. तसे असल्यास, त्यांना त्वरित फोनवरून काढून टाका.

हे आहेत ते 7 धोकादायक ॲप्स

Now QRcode Scan – 10,000+ इंस्टॉल
EmojiOne Keyboard – 50,000 हून अधिक इंस्टॉल
Battery Charging Animations Battery Wallpaper – 1,000 हून अधिक इंस्टॉल
Dazzling Keyboar – 10 इंस्टॉल
Volume Booster Louder Sound Equalizer – 100 इंस्टॉल
Super Hero-Effect – 5,000 इंस्टॉल
Classic Emoji Keyboard – 5,000 इंस्टॉल

Google ने प्रतिबंधित केलेल्या 7 धोकादायक ॲप्सची सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे ते मालवेअर हल्ल्यांद्वारे बनावट सदस्यता आणि ॲप्स खरेदी यासारख्या बेकायदेशीर फसवणूक ऑफर करतात. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांनी या लिंक्स आणि अनावश्यक खरेदीकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सध्याच्या काळात लोक ऑनलाइनकडे वळत आहेत. अशा स्थितीत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी सावध राहण्याची गरज आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here