Google: गुगल देणार तुम्हाला पैसे, असा करा क्लेम

0

नवी दिल्ली,दि.17: Google: गुगल तुम्हाला पैसे देणार आहे. तुम्ही जर गुगलवर काही सर्च केले असेल तर तुम्हाला याकरिता क्लेम करता येईल. जर तुम्ही 2006 ते 13 या काळामध्ये गुगलवर तुम्ही काही सर्च केले असेल तर त्याबदल्यात तुम्हाला गुगल कंपनी पैसे देणार आहे. या काळात गुगलने तुमचा विश्वासघात केला होता, याची भरपाई म्हणून युजरना हे पैसे दिले जावेत असा आदेश अमेरिकेच्या कोर्टाने दिला आहे. 

Google: गुगल देणार तुम्हाला पैसे

गुगलने तुम्ही केलेल्या सर्चचा डेटा तुम्हाला विश्वासात न घेता थर्ड पार्टी कंपन्यांना विकला होता. यामुळे त्याची भरपाई गुगल करत आहे. गुगलने या सर्व दाव्यांचे खंडन केले होते. परंतू, या आरोपांपासून सुटका करून घेण्यासाठी गुगलने प्रति युजर काही रक्कम देण्याचे कबुल केले होते. या नुसार गुगल 26 मिलिअन डॉलर देणार आहे. या काळात तुम्ही काहीही सर्च केलेले असेल तर तुम्हाला यातील पैसे मिळणार आहेत. 

यासाठी गुगलने तारखा दिलेल्या आहेत. 26 ऑक्टोबर 2006 ते 30 सप्टेंबर 2013 या काळात सर्च झालेले असेल तर त्या युजरला पैसे दिले जाणार आहेत. या पैशांना क्लेम करण्याची अखेरची तारीख 31 जुलै आहे.

असा करा क्लेम

पैसे क्लेम करण्यासाठी तुम्हाला http://refererheadersettlement.com या वेबसाईटवरजावे लागणार आहे. तिथे तुम्हाला कोर्टाच्या हवाल्याने एक पेज दिसेल. त्यावर रजिस्ट्रेशन फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला काही माहिती भरावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला क्लास मेंबर आयडी देण्यात येईल. क्लेम सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो क्लास मेंबर आयडी टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे क्लेम करता येणार आहेत. क्लेम केल्यावर तुम्हाला 7.70 डॉलर म्हणजेच 630 रुपये मिळणार आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here