Girish Mahajan On NCP: गिरीश महाजन यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात मोठे वक्तव्य

0

जळगाव,दि.9: Girish Mahajan On NCP: भाजपा नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला आहे. त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन? | Girish Mahajan On NCP

उद्धव ठाकरेंना ज्याप्रमाणे चिन्हापासून सुरुवात करावी लागली, त्याचप्रमाणे शरद पवारांना आता नव्याने पक्ष उभारणी करावी लागेल. नव्याने संघटना उभी करावी लागेल. त्यासाठी ते प्रयत्न करतायेत हे चांगलं आहे. त्यांच्या पक्षाचा, चिन्हाचा निर्णय अजून आलेला नाही. पण बहुसंख्य आमदार आज अजित पवारांकडे आहेत. शरद पवारांकडे फक्त आठ-दहा आमदार शिल्लक आहेत. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं, कार्यालय कुणाचं? अशी लढाई आता सुरू होईल. जे शिवसेनेत झालं तेच आता राष्ट्रवादीत होईल, असं गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे वर्ध्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आपल्या पन्नास मुख्य पदाधिकाऱ्यांसह सामुहिक राजीनामा दिला आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याचं राजीनामा देताना मोहिते यांनी म्हटलं आहे. हा वर्ध्यात राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here