Germany On Rahul Gandhi: अमेरिकेनंतर आता जर्मनीनेही केलं राहुल गांधींवरील कारवाईवर भाष्य

0

मुंबई,दि.30: Germany On Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अमेरिकन खासदार रो खन्ना (Ro Khanna) यांनी प्रतिक्रिया दिली होती. भारतातील सर्व विरोधी पक्षांनी गांधी यांच्यावरील कारवाईबाबत निषेध व्यक्त केला आहे. राहुल गांधींवरील कारवाईविरोधात देशभरातलं वातावरण तापलं असतानाच आता त्याची भारताबाहेरही दखल घेतली जाऊ लागली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी ही कारवाई अयोग्य असल्याचं म्हटलं होते.

काय आहे प्रकरण? | Rahul Gandhi Disqualification

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. (Rahul Gandhi) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. 

Germany On Rahul Gandhi | जर्मनीनेही यावर भाष्य केले आहे

काँग्रेस या कारवाईला विरोध करत आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपा आणि एनडीएतील पक्ष या कारवाईचं समर्थन करत आहेत. राहुल गांधींवरील कारवाईनंतर देशभर आंदोलनं सुरू असताना जगभरातील अनेक राष्ट्रांचंदेखील या कारवाईकडे लक्षं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज जर्मनीनेही याप्रकरणावर भाष्य केलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईची आम्ही दखल घेतली आहे. आमच्या माहितीनुसार राहुल गांधी याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यानंतर ही कारवाई योग्य की अयोग्य हे स्पष्ट होईल. आम्ही या प्रकरणाकडे लक्ष ठेऊन आहोत. राहुल गांधी यांच्यावर कारवाई करताना लोकशाहीची मूलभूत तत्त्वं पाळली जावी, अशी प्रतिक्रिया जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींवरील कारवाईप्रकरणी प्रतिक्रिया देणारा जर्मनी हा पहिला युरोपीय देश आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमेरिकेनेही याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणात अमेरिकेला कोणताही हस्तक्षेप करायचा नाही. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी आम्ही भारत सरकारच्या सतत संपर्कात आहोत. कायद्याचे शासन आणि न्यायालयीन स्वातंत्र्याचा आदर हे कोणत्याही देशाच्या लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ आहेत आणि आम्ही भारतीय न्यायालयात सुरू असलेलं राहुल गांधींचं प्रकरणाकडे लक्ष ठेऊन आहोत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी दिली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here