भाजपाने तुम्हाला पंतप्रधान पदाची ऑफर तर दिली नाही ना?: गौतम गंभीर

0

नवी दिल्ली,दि.२५: भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी आम आदमी पक्षावर टीका केली आहे. आम आदमी पक्षाकडून भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजपाकडून आपचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनीष सिसोदियांवरील कारवाईवरून आम आदमी पक्षाकडून सातत्याने भाजपावर टीका केली जात आहे.

भाजपाकडून दिल्ली सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असून आमच्या आमदारांना विकत घेण्यासाठी २०-२० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे. ‘आप’च्या या आरोपाला आता भाजपा नेते गौतम गंभीर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केजरीवालजी तुम्हाला भाजपाकडून पंतप्रधान पदाची ऑफर तर नाही आली ना? असा टोला गंभीर यांनी लगावला आहे.

दिल्लीत सध्या भाजपा विरुद्ध आप असा संघर्ष सुरू आहे. यात आता खासदार गौतम गंभीर यांनीही उडी घेतली आहे. गंभीर यांनी एक ट्वीट करत अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला आहे. केजरीवालजी, २०२४ साठी भाजपाने तुम्हाला पंतप्रधान पदाची ऑफर तर दिली नाही ना? असा प्रश्न गौतम गंभीर यांनी विचारला आहे.

दरम्यान, आज केजरीवाल यांनी आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर दिल्लीतील सरकार स्थिर असून कोणताही आमदार फुटणार नाही, असा विश्वास आप पक्षाने व्यक्त केला. असे असले तरी या बैठकीला काही आमदार अनुपस्थित होते. या आमदारांशी फोन कॉलद्वारे चर्चा झाल्याचे आप पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here