“हिंदीह्रदयसम्राट मराठीचे मारेकरी आणि हिंदीचे सेवेकरी…”

0

मुंबई,दि.२९: Gajanan Kale Shared Devendra Fadnavis Photo महाराष्ट्रात शाळेत पहिलीपासून हिंदी सक्ती करण्यास विरोध केला जात आहे. मनसेने ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. या मोर्चात शिवसेना (ठाकरे गट) सहभागी होणार आहे. हिंदी सक्तीला विरोध करत प्रथमच राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार आहेत. हिंदी सक्तीवरून सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

हिंदीह्रदयसम्राट मराठीचे मारेकरी आणि हिंदीचे सेवेकरी…

मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सोशल मिडीयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक पोस्ट केली आहे. X वर (पूर्वीचे ट्विटर) काळे यांनी पोस्ट शेअर करत फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना हिंदीह्रदयसम्राट मराठीचे मारेकरी आणि हिंदीचे सेवेकरी असे म्हटले आहे. 

गजानन काळे यांनी X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये फडणवीस यांना हिंदीह्रदयसम्राट म्हणून डिवचले आहे. “मराठी” चे मारेकरी, “हिंदी”चे सेवेकरी असा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच “चलो बच्चों अब हिंदी भाषा सिखनाही है…” असे पोस्टमध्ये लिहिले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here