25 ऑक्टोंबरपासून हे सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय मिळणार नाही पेट्रोल डिझेल

0

नवी दिल्ली,दि.13: 25 ऑक्टोंबरपासून PUCC सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय पेट्रोल डिझेल मिळणार नाही. हा नियम दिल्ली सरकारने (अरविंद केजरीवाल) लागू केला आहे. दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीत प्रदूषणाची समस्या मोठी आहे. राजधानी दिल्लीत वाहनांची संख्याही मोठी आहे. वाढत्या प्रदूषणामुळे अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

दिल्लीमध्ये वाहन चालवताना तुमच्याकडे हे एक सर्टिफिकेट असणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्याकडे एक सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड आणि याशिवाय पेट्रोल-डिझेल देखील मिळणार नाही असा नियम काढण्यात आला आहे. हा नियम जरी सध्या दिल्लीपुरता असला तरी पुढच्या काही महिन्यात मुंबई आणि महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही.

दिल्लीमध्ये प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचं सरकार प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. PUCC सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. 25 ऑक्टोबरपासून प्रत्येक पेट्रोल पंपावर हे सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही असा नियम आणला आहे.

ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल त्यांना 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल अशी शिक्षा आहे. 25 ऑक्टोबरनंतर ज्या चालकांकडे व्हॅलीड पीयूसी सर्टिफिकेट नसेल, त्याला इंधन मिळणार नाही. दिल्ली परिवहन विभागाने वाहन मालकांना गैरसोय आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी निर्धारित तारखेपूर्वी वैध PUCC प्राप्त करण्यास सांगितले आहे.

वैध PUCC शिवाय वाहन चालवल्यास 10,000 रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे परिवहन विभागाने नोटीसमध्ये म्हटले आहे. दिवाळीआधी टाकी फुल्ल करण्यापेक्षा PUCC सर्टिफिकेट काढण्याकडे अधिक लक्ष द्या. याशिवाय गाडीची कागदपत्रही नीट आहेत का ते तपासा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here