30 मे पासून Google चा नवीन नियम होत आहे लागू

0

मुंबई,दि.6: Google: गुगलने आपले नियम बदलले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (AI) मदतीने गुगलच्या नियमांना बगल देऊन अश्लीलतेला चालना दिली जात होती, त्यासंदर्भात गुगलने आपले नियम बदलले आहेत. वास्तविक, Google ने आपल्या जाहिरात धोरणात कठोर तरतुदी केल्या आहेत, ज्यामुळे कोणत्याही वापरकर्त्यांना अश्लील व्हिडिओ किंवा फोटोंचा प्रचार करण्यापासून प्रतिबंधित केले जाते. तसेच एआय ॲप्सच्या मदतीने बनवलेले फोटो आणि व्हिडिओंवर बंदी घालण्यात आली आहे.

गुगलचा नवा नियम होणार लागू

गुगलचा नवा नियम 30 मे 2024 पासून देशभरात लागू होणार आहे. यानंतर जर कोणी डीपफेक पॉर्न व्हिडिओ तयार केला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. सोप्या शब्दात, लैंगिक उत्तेजक सामग्री देणाऱ्या साइट आणि ॲप्सवर कारवाई केली जाईल.

नियमांचे उल्लंघन केल्यास…

जर कोणी नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, अशा ॲप्स, वेबसाइट आणि पोस्ट कोणत्याही चेतावणीशिवाय त्वरित निलंबित केले जातील.

का उचलावे लागले पाऊल?

गुगलच्या म्हणण्यानुसार पोर्नोग्राफिक कंटेंट तयार करण्यासाठी टूल्स आणि ॲप्स बाजारात सहज उपलब्ध होते. तसेच त्यांचा गैरवापरही केला जात होता. अशी ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर चुकीच्या नावाने लिस्ट करण्यात आली होती.

गुगलने लैंगिक सामग्री दाखवण्याचे नियम बदलले आहेत. यासाठी गुगलने अशा सेवांवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे जी शॉपिंग जाहिरातींदरम्यान प्रौढ डीपफेक तयार करतात. Google च्या वार्षिक जाहिरात सुरक्षा अहवालानुसार, 2023 मध्ये Google ने प्रौढ सामग्री धोरणाच्या उल्लंघनासाठी 1.8 अब्ज जाहिराती काढून टाकल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here