सोलापूर,दि.4: Freight Train Derailed: सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली मालगाडी करमाळा तालुक्यातील केम रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे रुळावरुन घसरली (Freight Train Derailed) आणि थेट शेतात घुसल्याची धक्कादायक घटना घडलीये. ही घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मात्र, यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
यात कोणतीही दुर्घटना झालेली नाही. मात्र रेल्वेचे नुकसान झाले आहे. सोलापूरकडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅकवरुन मालगाडी जात होती. या गाडीचे रेल्वे इंजिन घसरले आहे. त्यातील लुप लाईनवर हा प्रकार घडला. ब्रेक फेल झाल्यामुळे हा प्रकार झाला.
पुण्याकडे जाणारी मालगाडी रेल्वे रुळावरून (Freight Train Derailed) थेट शेतात घुसल्याने घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. या घटनेनंतर सोलापूर मध्य रेल्वेचे अधिकारी केम रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले आहेत.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी मालगाडी रविवारी मध्य रात्रीच्या सुमारास सोलापूर पुण्याकडे मार्गस्थ झाली होती. पहाटे तीन वाजेच्या सुमारास केम हद्दीत ती घसरली (Freight Train Derailed) आणि शेतातील मातीत जाऊन फसली. या घटनेमुळे मध्य रेल्वेचे नुकसान झाले असून दोन ते तीन डबे रुळावरून खाली घसरल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.