Barshi News: श्री शिवाजी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

श्री शिवाजी महाविद्यालय: माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासाठी दिली 51 हजार रुपये देणगी

0

सोलापूर,दि.24: Barshi News: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे रविवार दि. 22 जानेवारी 2023 रोजी बीएससी 1989 या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरकारी वकील प्रदीप भोसले यांनी केले यानंतर संस्थेचे सचिव पी टी पाटील कार्याध्यक्ष शितोळे गुरुवर्य प्राध्यापक वर्ग यांचा सत्कार करण्यात आला.

प्राध्यापक धनंजय पन्हाळकर यांनी केले मनोगत व्यक्त | शिवाजी विद्यालय

यानंतर संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधित्व म्हणून प्राध्यापक धनंजय पन्हाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून प्राध्यापिका गायत्री जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय नोकरीचे ठिकाण कौटुंबिक माहिती असा परिचय करून दिला. दुपारी मान्यवराच्या सोबत सहभोजन झाले. सहभोजन झाल्यानंतर महाविद्यालयातील सर्व डिपार्टमेंटला तसेच ग्रंथालय गार्डन व इतर परिसर यांना सर्वांनी भेटी दिल्या.

अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना दिला उजाळा | Barshi News

डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या वापरात आलेल्या वस्तूंचे संग्रहालय सर्वांना खूपच आवडले. कारण यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी मामासाहेब जगदाळे यांना जवळून पाहिले होते तसेच त्यांचे मार्गदर्शन घेतले होते. दुपारच्या सत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. त्यामध्ये बबन साळुंखे PSI यांनी अतिशय सुंदर कविता सादर केली. अनंत सूर्यवंशी (शिक्षक) यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केल्याचे अनुभव सांगितले अजित कुलकर्णी यांनी तर महाविद्यालयाचे आपले अनुभव सांगत असताना अतिशय हास्यांचा कल्लोळ उडवला.

टि. के. चव्हाण महाराष्ट्र राज्याचे उपसचिव सॉलिसेटर यांनी आपले न्यायालयीन अनुभव व्यक्त केले. भाऊसाहेब भांडवलकर यांनी मी शिक्षकीपेशा सोडून पॅथॉलॉजीकडे कसे वळलो हे सांगितले. डॉक्टर माणिक काळे यांनी आपण M Sc. Chemistry करून संशोधन कसे गेलो ते सांगितले. बाकी सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनेक उच्च पदावर असणाऱ्या सर्व मित्रांच्या भेटी 34 वर्षांनी झाल्या होत्या. बरेचसे मित्र एकमेकाला ओळखू शकले नाहीत. महाविद्यालयातील प्राचार्य शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य देखील 1988 च्या बॅचचे होते. त्यामुळे ते देखील आम्हा सर्वांना ओळखत होते. त्यामुळे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले आणि जड अंतकरणाने कार्यक्रमाचा शेवट झाला.

महाविद्यालयासाठी दिली 51 हजार रुपये देणगी

आपण या संस्थेचे ऋण फेडावे या उद्देशाने B.Sc. बॅच 1989 तर्फे आपण या महाविद्यालयाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून महाविद्यालयासाठी रोख रुपये 51 हजाराचा चेक देण्यात आला. अतिशय हलाक्याची परिस्थिती असणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची ज्ञानगंगा उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीर मामासाहेब नगरीमध्ये सर्व माजी विद्यार्थी नतमस्तक झाले. यावेळी महाविद्यालयाचे बॅचला शिकवत असणारे प्राध्यापक आर बी कुलकर्णी, पाटील, डॉक्टर कराड, प्राध्यापिका शिंदे, प्राध्यापिका जाधव, प्रा. लोखंडे, डॉक्टर विभूते तसेच वर्गमित्र चाटी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बॅचचे इनामदार वकील, प्रदीप बोचरे, सुरेश जगदाळे, कालिदास झिने व जाधव यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इनामदार व प्रदीप बोचरे यांनी केले. आणि शेवटी आभार जगदाळे यांनी मानले व शेवटी सर्वांनी जड अंतकरणाने निरोप घेतला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here