सोलापूर,दि.१४ : मोहोळ तालुक्यातील वाघोली-वाघोलीवाडी येथील माजी सरपंच मुकुंद पाटील यांची मोहोळ संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
या समितीमध्ये सामाजिक, अनुसूचित जाती-जमाती, महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, सर्वसाधारण, दिव्यांग, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक, शासकीय प्रतिनिधी या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल मुकुंद पाटील यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. वाघोली जिव्हाळा ग्रुपतर्फे मुकुंद पाटील यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (दि.१५) मुकुंद पाटील यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.