बुलढाणा,दि.७:: भाजपचे नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या कारला समोरुन येणाऱ्या बसने धडक दिली. यामध्ये शिंदे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी अकोला ते अमरावती रस्त्यावर कुरणखेड गावाजवळ घडली.
माजी आमदार विजयराज शिंदे हे अमरावती येथे भाजप नेते अनिल बोंडे यांना भेटण्यासाठी ७ ऑक्टोंबर रोजी कार क्र.एमएच २८ एएन २७५७ ने येथे जात होते. दरम्यान, कुरणखेड गावाजळ त्यांच्या कारला समोरुन येणाऱ्या अकोला ते कारंजा बसने समोरासमोर धडक दिली. यामध्ये विजयराज शिंदे हे जखमी झाले. अपघातानंतर जखमी झालेल्या विजयराज शिंदे यांना अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.