सोलापूर,दि.11: सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्यामार्फत जुना जकात नाका अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ समोर सोलापूर-पुणे रोड येथे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मोकाट व भटके श्र्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण उपक्रम राबविण्याकरिता कार्यप्रणाली कार्यान्वीत केलेली आहे.
नवसमाज निर्माण बहुउद्देशिय संस्था, नंदूरबार यांना कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण कामाचा मक्ता देण्यात आला आहे. प्रत्य़क्षात निर्बिजीकरण व लसीकरण या कामाची सुरूवात 13/10/2023 रोजी करण्यात आली आहे. सध्या निर्बिजीकरण व लसीकरण करण्याचा कार्यक्रम दररोज प्राप्त़ होणाऱ्या तक्रारी नुसार कार्यरत आहे. तथापि हा कार्यक्रम दिवाळी सणा निमित्त़ दिनांक 11/11/2023 पासून ते 15/11/2023 पर्यत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दिनांक 16/11/2023 पासून सदर काम पुर्ववत चालू होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार करावयाची असल्यास कार्यालयीन अधिक्षक म. गांधी प्राणीसंग्रहालय तसेच मक्तेदार यांच्या कडून हेल्प़लाईन क्रमांक 7666513026 जारी करण्यात आला आहे. तरी दिनांक 16/11/2023 पासून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.