दि.7: Viral Video: मासा हा जलचर प्राणी आहे. मासा पाण्यात विविध कर्तब करू शकतो. माशाला पाण्यातूनच ऑक्सीजन मिळतो पाण्याविना मासा तडफडून मरू शकतो, हे अनेकांना माहिती आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक
गोल्ड फिशचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या लहानशा माशाने चक्क एक ऑपरेडेट व्हेईकल चालवून दाखवलं आहे. इस्राइलच्या बेन गुरियॉन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा अनोखा प्रयोग करून पाहिला होता. या प्रयोगामध्ये करण्यात आलेलं निरिक्षण बिहेवेरिअल ब्रेन रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
मासे पाण्यात आपला रस्ता कसा शोधतात? त्यांच्या मेंदूची नेव्हिगेशन सिस्टम समजून घेण्यासाठी या संपूर्ण प्रोजेक्टची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये शास्त्रज्ञांनी एक रोबोटिक कार तयार केली. या कारच्या वरच्या बाजूस एक फिश टँक ठेवला आणि त्यामध्ये गोल्ड फिश सोडण्यात आला. शिवाय माशाच्या तोंडाची दिशा समजण्यासाठी त्यावर यंत्र लावण्यात आलं. दरम्यान या यंत्राच्या खाली एक कॅमेरा देखील होता. अन् ही सर्व यंत्र एका संगणकाला जोडण्यात आली होती. परिणामी लहानातली लहान हालचाल देखील टिपता येईल. लक्षवेधी बाब म्हणजे जेव्हा हा मासा आपलं तोंड फिरवायचा तेव्हा रोबोटिक कारही त्याच्यासोबत पुढे मागे जायची.
या अनोख्या प्रयोगाचा व्हिडीओ @bengurionu या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रयोगात मासा एका एक्वेरिअममध्ये बसून ज्या दिशेला पाहत होता किंवा ज्या दिशेला पोहोत होता त्याच दिशेला कार जात होती. या पार्श्वभूमीवर मासे देखील आपल्या मेंदूचा वापर करून गाडी चालवू शकतात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.