‘आधी या ट्विटचा निकाल द्या नंतर…’ एलॉन मस्कच्या ट्विटवर जयंत पाटील यांचे ट्विट

Jayant Patil Tweet: जयंत पाटील यांच्या या ट्विटची आता राज्यभर चर्चा सुरू झालीय

0

मुंबई,दि.19: Jayant Patil On Elon Musk: ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Issue) चिघळला आहे. सीमावादावरून दोन्ही राज्यात तणाव निर्माण झाला आहे. राज्यातील विरोधी पक्ष यावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटरवरून वाद निर्माण झालाय. परंतु, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र हे ट्विट बसवराज बोम्मई यांनी केले नाही असे म्हटले आहेत.

एलॉन मस्क यांचे ट्विट

टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपल्या नव्या ट्वीटमध्ये ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर वापरकर्त्यांनाच आपल्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला. तसेच ट्विटर वापरकर्ते जो कौल देईल त्याप्रमाणे आपण करू असं म्हटलं आहे.

त्यांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनीही एलॉन मस्क यांना उद्देशून एक ट्वीट केलं आहे.

Jayant Patil On Elon Musk

ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार होऊ का, असा सवाल एलन मस्क यांनी विचारला आहे. परंतु, जयंत पाटील यांनी थेट मस्क यांनाच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादातच ओढलं आहे. जयंत पाटील यांच्या या ट्विटची आता राज्यभर चर्चा सुरू झालीय.

Jayant Patil On Elon Musk | जयंत पाटील ट्विट करत काय म्हणाले?

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्वीट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. इलॉन मस्क, आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ?” असं जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

“मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावं का? मी या ट्विटर पोलच्या निकालाला बांधील असेन.” असं एलॉन मस्क म्हणाले आहेत. या ट्वीटवर मस्क यांचे चाहते त्यांनी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होऊ नये असं सांगत आहेत. दुसरीकडे मस्क यांच्या निर्णयांवर नाखूश वापरकर्ते या ट्विटर पोलला काहीही अर्थ नाही, असं सांगत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here