सोलापूर जिल्ह्यातील पानमंगरूळ येथे भर चौकात गोळीबार

0

सोलापूर,दि.6: सोलापूर जिल्ह्यातील पानमंगरूळ येथे भर चौकात गोळीबार एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ येथे भर चौकात एस टी स्टँड, ग्रामपंचायत ऑफिससमोर एका अज्ञात व्यक्तीने केगाव बु येथील गुल्या नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करून गंभीर जखमी केले आहे.

पानमंगरूळ येथे भर चौकात एस टी स्टँड, ग्रामपंचायत ऑफिससमोर शनिवार दि.6 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली आहे. जखमीला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत जखमीच्या डाव्या बाजूच्या पोटात गोळी घुसली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here