Uttamprakash Khandare: माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

Uttamprakash Khandare: पीडितेला दिलेले चेक झाले बाऊन्स

0

सोलापूर,दि.17: राज्यात पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये क्रीडा खात्याचे राज्यमंत्री राहिलेले उत्तमप्रकाश खंदारे (Uttamprakash Khandare) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह एका महिलेचाही आरोपी म्हणून सहभाग आहे. अद्यापपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

लग्नाचे आमिष दाखवून आणि… | FIR Against Uttamprakash Khandare

लग्नाचे आमिष दाखवून आणि मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देऊन उत्तम खंदारे यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एका 37 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी एका 37 वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्तम प्रकाश खंदारे (वय 65, रा. सोलापूर), त्यांचे साथीदार बंडू दशरथ गवळी (रा. सोलापूर) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बी रेस्ट हाऊस व बिबवेवाडीत 2012 पासून ते आत्तापर्यंतच्या काळात घडला आहे.

Uttamprakash Khandare
उत्तमप्रकाश खंदारे

अकरा वर्षानंतर महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. खंदारे यांनी मुलाचा सांभाळ करतो, असे सांगून लग्नाचे आमिष दाखवून महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. मुलाच्या संगोपनासाठी त्यांनी दिलेले चेक वटले नाहीत. तसेच महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. खंदारे तत्कालीन शिवसेना-भाजप युतीमध्ये सामाजिक न्याय तथा क्रोडा मंत्री होते. तसेच उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ते तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

चाकूच्या धाकाने…

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, उत्तम खंदारे यांनी फिर्यादी महिलेला लग्नाची आमिष दाखवून आणि तिच्या मुलांचा सांभाळ करतो असे भाषण चाकूच्या धाकाने तिच्यासोबत नैसर्गिक आणि अनैसर्गिक संभोग केला. फिर्यादीने महिलेने नकार दिला असता तिला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

चेक बाऊन्स झाले

या संबंधातून जन्माला आलेल्या मुलाच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद म्हणून उत्तमप्रकाश खंदारे यांनी काही धनादेश फिर्यादी महिलेला दिले होते. परंतु ते धनादेश बँकेत वटले नाही. त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादी महिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here