सोलापूर,दि.29: Fate Scam: गुंतवणुकदारांना मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून परतावा न देता फसवणुक व आथिर्क गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल अंबादास फटे (Vishal Fate) वय 32 वषे याचेसह 2) अंबादास गणपती फटे 3) वैभव अंबादास फटे 4) राधिका विशाल फटे 5) अलका अंबादास फटे सर्व रा.बार्शी यांचेविरुध्द बार्शी शहर पोलिसांनी बार्शी येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. याप्रकरणी दिपक बाबासाहेब अंबारे वय 37 वषे, रा. बाशी याने बार्शी शहर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली होती.
त्याने फिर्यादीत केलेल्या आरोपानुसार सन 2019 मध्ये शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून फायदा करून देण्याचे आश्र्वासन दिल्याने त्याने विशाल फटे याचे विश्लका कन्सलंटसी प्रा.लि. अलका शेअर सव्हिसेस, जे एम फायनान्शियल सव्हिसेस या विशाल फटे, अंबादास फटे, वैभव फटे, अलका फटे यांचे नावे असलेल्या कंपनीमध्ये रकमा गुंतविल्या.तो लोकांना ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून दररोज 2 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित होता . विशाल फटेवर विश्र्वास ठेवून फिर्यादीने शाहान्नव लाख पन्नास हजार, त्याचा भाऊ किरण अंबारे पन्नास लाख, त्याचा मित्र संग्राम मोहिते याने तीन कोटी साठ लाख वीस हजार, रोहित व्हनकळस याने पस्तीस लाख, सुनिल जानराव याने वीस लाख, हणुमंत ननवरे याने दोन लाख असे एकूण पाच कोटी त्रेसष्ठ लाख पंचवीस हजार रक्कमेची गुंतवणुक केली. परंतु आरोपीने ती परत न देता विश्र्वासघात व फसवणुक केली अशा आशयाची फिर्याद बाशी शहर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी तपास पूर्ण करून बाशी येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे . त्यामध्ये एकूण 101 साक्षीदारांची टिपणे आहेत. दोषारोपपत्राप्रमाणे एकूण 559 गुंतवणुकदारांनी एकूण 41 कोटी 14 लाख रूपयांची फसवणुक केल्याचे नमुद केलेले आहे. सर्व आरोपी विरुद्ध भा.द.वि. कलम 409, 420, 406, 417, 37 व महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे दोषारोप पत्र दाखल करणात आलेले आहे.
यात आरोपी तफे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. नितीन शिंदे , अॅड. वैष्णवी न्हावकर , अॅड. राहुल रूपनर, अॅड. शैलेशकुमार पोटफोडे तर सरकारपक्षा तफे अँड. बोचरे हे काम पाहत आहेत.