Faridabad: आकाश पाळणा कोसळला, अनेक जण जखमी 

0
Faridabad: आकाश पाळणा कोसळला, अनेक जण जखमी

फरिदाबाद,दि.८: Faridabad Accident: आकाश पाळणा कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत तर मदतीसाठी आलेल्या पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी दुर्घटना हरियाणातील फरिदाबाद येथे भरणाऱ्या सूरजकुंड यात्रेत (Surajkund Fair Accident) घडली आहे. अचानक एक पाळणा तुटला, ज्यामुळे गर्दीत घबराट पसरली. अपघाताच्या वेळी पाळण्याजवळ मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. अपघाताच्या वेळी पाळण्यात २६ लोक होते.

बचाव कार्यादरम्यान पोलिस निरीक्षक जगदीश प्रसाद यांचा मृत्यू झाला. उपायुक्त आयुष सिंह यांनी सांगितले की, या अपघातात १२ जण जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी ६:१५ च्या सुमारास घडला.

पोलिस उपायुक्त आयुष सिन्हा म्हणाले, “हा एक अतिशय दुःखद अपघात आहे. पोलिस निरीक्षक जगदीश प्रसाद यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. जेव्हा झुला थोडासा तुटला तेव्हा ते मदतीसाठी पुढे सरसावले. यादरम्यान झुल्याचा एक भाग त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर आदळला.”

मुख्यमंत्री नायब सैनी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. संध्याकाळी 6.15 वाजता झूला कोसळला. घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्वांना फरिदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या आजूबाजूच्या जत्रेचा परिसर रिकामे करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here