माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही वारंवार बाळासाहेबांची आठवण येते : चंद्रकांत पाटील

0

सोलापूर,दि.29: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही वारंवार बाळासाहेबांची आठवण येते असे म्हटले आहे. एनसीबीचे समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून बाळासाहेबांची आठवण करून देत न्याय करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही आपल्याला बाळासाहेबांची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, क्रांती रेडकरच नाही तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही वारंवार बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेब असते तर त्यांनी काठी घेऊन सगळ्यांना बरोबर केलं असतं. 1995 ते 1999 काळात सरकार असताना कुणाची हिंमत होत नव्हती कोणाची… बाळासाहेब चुकणाऱ्या मंत्र्यांना मातोश्रीवर बोलवत असतं.

चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे कौतुक करत ‘काँग्रेसचे नेते वेल कल्चरड आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते सुसंस्कृत आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भुलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here