सोलापूर शहर उत्तर मतदारसंघासाठी आचारसंहिता कक्षाची स्थापना

0

सोलापूर,दि.16: सोलापूर शहर उत्तर मतदारसंघासाठी आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघ व माढा लोकसभा मतदार संघात 7 मेला मतदान होणार आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व भाजपा आमदार राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने, 42 (अ.जा) लोकसभा मतदारसंघांतर्गत, 248 ,सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रक्रिया पार पाडावयाची असल्याने आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून, नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्र. 0217-2990002 असा असून या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन अति. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी  तथा 42-(अ.जा) सोलापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ सोलापूर यांनी केले आहे. हा आचारसंहिता कक्ष 24 तास सुरू राहणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here